Sambhajinagar Dowry : विवाहितेच्या छळाप्रकरणी पती आणि दोन नणंदविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आलाय. या प्रकरणी पती अजीम शेखसह दोन नणंदांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या छळ प्रकरणात वेळ पडली तर कलम वाढवली जातील. आरोपींच्या शोधासाठी दोन टीम पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली.
हे ही वाचा
हिना - श्रीमंताला न्याय मिळतो आम्हा गरिबाला न्याय कधी मिळणार..
नऊ महिने शोल्डरने चटके देणारी हिना म्हणते गरिबाला कोण न्याय देणार. गरिबांना जायचं कुठं पोलीस म्हणतात की आम्ही शोधतोय. पण अजून हिना चा अमानुष छळ करणारा नवरा सासू-सासरे दोन नंदांना पोलिसांना अटक करण्यात यश आलं नाही.. वडिलांनी शेती विकून हिनाच्या लग्नात पाच लाखाचा हुंडा दिला, आता पुन्हा 25 लाख मागतोय ते पैसे द्यायचे कुठून. शिवाय वडील ज्यावेळेस मुलीला भेटायला गेले त्यावेळेस मुलीला बांधून ठेवलं होतं. काय झालं हिना सोबत गेल्या नऊ वर्षात तिनी आणि तिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपबीती सांगितली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
हिना- गेल्या नऊ वर्षापासून माझा सातत्याने छळ सुरू होता. पट्ट्याने बांधायचे ,मला मारहाण करायचे. नंदा आणि सासू-सासरे सोडवत नव्हते. माझा पती क्रुझर चालवतो. नऊ वर्षापासून सगळं सुरू होतं पैसे आणा असं म्हणत होते. पहिले पाच लाख दिले होते. आता 25 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाही म्हणून रोज मारत होते. वडील आले त्यावेळेस मला बांधलेलं होतं. वडिलांना सोडवलं आणि घरी आणलं .अजूनही त्याला अटक केली नाही. पोलीस वाले म्हणतात की आम्ही त्यांना अटक करू अजून घरचे देखील अटक केले नाहीत
वडीलांनी शेत विकुन जावयाला पाच लाख रुपये दिले होते. आता 25 लाख आन म्हणतो. मुलीला मारहाण करतो, मी लग्नाला गेलो मुलीला भेटायला गेलो तिला बांधून ठेवलं होतं मी गेल्यावर सोडलं. त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलीला वाटायचं आज उद्या सुधरेल म्हणून तिने मला कधी सांगितलं नाही .तिला न्याय द्या मी काल पोलीस अधिकाऱ्याकडे गेलो होतो तर नुसतं शोधतोय शोधतोय म्हणतात. पोलीस म्हणतात फरार आहे जावई समजूनच घेत नाही त्याला काय सांगणार. त्याला कठोरात कठोर शिक्षा करा. बांधून चटके दिले जात होते पण घरातलं कोणीही सोडत नव्हतं घरातलं कुणीतरी सोडायला हवं होतं.























