Sambhaji Nagar Pantpradhan Awas Yojana Tender Scam : ईडीने महानगरपालिका अधिकाऱ्याला बजावला समन्स
महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने शहरात 9 ठिकाणी छापेमारी केली. तब्बल 24 तास ही छापेमारी चालली. या घोटाळ्यात आता अधिकारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ईडी कार्यालयाने उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला समन्स दिलं होतं. त्यानंतर आज उपायुक्त अपर्णा थेटे या मुंबईत ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.शिवाय तत्कालीन मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी आणि कंत्राटदारांचे कॉल रेकॉर्डिंग ईडीचे अधिकारी तपासणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तत्कालीन मनपा आयुक्तांसह अधिकारी संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. ईडी करणार आज अधिकाऱ्यांची ही चौकशी...























