BJP vs Thackeray Chhatrapati Sambhajinagar : आदित्य ठाकरेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असून शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले व त्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली आहे. आक्रमक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती आहे. या लाठीचार्जमध्ये काही कार्यकर्तेही जखमी झाले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवा राजकीय घटनांना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज आदित्य ठाकरे आले असता भाजप आणि शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करून काही जणांना ताब्यातही घेतले आहे.
भाजप- शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजी नगर मध्ये आदित्य ठाकरे आले असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. या विरोधाला प्रतिउत्तर देत शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजीने वातावरण अधिकच तापले व दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. या घटनेत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.