तीन पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आरोप
चंद्रपूर : राज्यातील 3 पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाआघाडी सरकारने कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नितीन राऊत यांची फाईल फेटाळत असल्याचा दावा चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे.
ऊर्जा खात्याला 7-8 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिल्याशिवाय वीज बिल माफी शक्य नाही हे बावनकुळे यांनी लक्षात आणून दिले. सरासरी वीज बिलात दुरुस्ती आणि 4 महिन्यांचे प्रति महिना 300 रुपये असे एकत्रित 1200 युनिट वीज बिलमाफी देणार या आश्वासनापासून सरकार शब्द फिरवत आहे. राज्यातील नागरिकांना दिलासा न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.






















