![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dr Sheetal Amte Suicide Case :कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या?
चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अशातच पोलिसांनी केलेल्या नगपूरच्या एका फार्मासिस्टच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. तसेच यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही उपलब्ध आहे. डॉ. शीतल आमटे यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. ते काही दिवसांपासून पिसाळल्यासारखे करत होते, त्यामुळे त्यांना देण्यासाठी ही इंजेक्शन्स त्यांनी मागवली होती. 'अॅनेस्थेशिया' श्रेणीतील ही इंजेक्शन्स असून मागवलेल्या 5 इंजेक्शन्सपैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आता या इंजेक्शनवर तपास केंद्रीत केला आहे.
![Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/01/9e70c5712282940d58b4e3a4a2b421a117330635360541000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/4ea2e082153ab5c41ad461a0528cf3f81732972393732718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/6c3581cd402d969639d09e2bbe1da6b91732958024222719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/4535462bebb3ecbf3fdf9b4d53626bc71732903818277976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/0c14f6fd431c1a924c987c5094a5fb411732903320742976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)