#MarathaReservation मराठा आरक्षण संघर्ष समितीकडून 10 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. नऊ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं देण्यात आलाय. आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये संघर्ष समितीने पत्रकार परिषद पार पडली. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिलाय.




















