एक्स्प्लोर
Buldhana Crime : ज्यांनी अपहरणाचा कट रचला, त्यांनाच दिली नोकरी,राधेश्याम चांडक यांचं सर्वत्र कौतुक
Buldhana Crime : बुलढाण्यातील दोन दिग्गज सहकार महर्षी राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उघड झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे २० आणि २१ वर्षे वयाच्या तीन युवकांनी हा कट रचल्याचं समोर आलं होतं. पैशासाठी या तरुणांनी असा कट रचल्याचं उघड झालं होतं. या घटनेनंतर राधेश्याम चांडक यांनी मोठं मन दाखवून या युवकांना माफ केलंच. त्यापुढे सामाजिक दायित्व दाखवून त्यांना संस्थेत नोकरी देण्याचं किंवा व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव त्यांच्या कुटुंबीयांसमोर ठेवलाय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















