एक्स्प्लोर
Bomb scare at Taj Mahal |ताज महालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची भीती,पर्यटकांना बाहेर काढण्यास सुरुवात
Taj Mahal : देशाची शान असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ही अफवा असल्याचं आग्र्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केलं. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर ताजमहाल परिसरात जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















