भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा सोनिया गांधींवर निशाणा; राजीव गांधी फाऊंडेशनबाबत विचारले 'हे' प्रश्न
नवी दिल्ली : राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवर निशाणा साधला. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? असा सवाल विचारला. तसेच आणखी 10 प्रश्न जेपी नड्डा यांनी विचारले आहेत.
कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूळ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देश सुरक्षित आहे. देशातील जनतेला हे जाणून घ्यायचं आहे की सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केलं? देशातील नागरिकांचा कसा विश्वासघात केला? हे सोनिया गांधी यांनी सांगावं, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.






















