Mumbai लगतच्या Panvel मध्ये भाजपचं मंथन, प्रमुख नेत्यासह 800 पदाधिकारी उपस्थित राहणार : ABP Majha
गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालीय. शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. बंडखोर एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या मदतीने भाजपनं राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तांतरानंतर भाजप नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर मुंबईलगतच्या पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक होतेय.. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह राज्यभरातून आठशे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यकारिणीचा समारोप होणार आहे. सत्तांतरानंतर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकांवर भाजपचं लक्ष आहे.




















