एक्स्प्लोर

Bhandara Fire: '21 मिनिटं' भंडाऱ्यातील 'त्या' बाळांचा आगीशी संघर्ष; CCTV फुटेजमधून स्पष्ट

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणात चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला मात्र स्थानिक पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांना फॉरेन्सिक विभागाच्या (एफएसएल)  काही अहवालांची प्रतीक्षा आहे. एफएसएलने पोलिसांकडून मिळालेल्या डीव्हीआरमध्ये एक सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना दुपारी 1:40 च्या सुमारास ही घटना घडली. हे सीसीटीव्ही फुटेज त्या खोलीचे आहे जिथे 10 मुले भाजली होती. सीसीटीव्ही फुटेजनुसार धुरामुळे बालके सुमारे 21 मिनिटे ओरडत राहिली. परंतु त्यांना वाचविण्यासाठी कोणीही खोलीत आले नाही. त्याशिवाय रुग्णालयातला कोणताही कर्मचारी त्या खोलीत हजर नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऑडिओही रेकॉर्ड झाला होता ज्यात सुमारे 21 मिनिटे धुरामुळे निष्पाप बाळं ओरडताना, रडताना दिसत आहेत.
भंडारा आग दुर्घटना : डॉक्टरांवर झालेली कारवाई मान्य नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांची मागणी

सूत्रांच्या माहितीनुसार, कालिना येथील राज्य संचालक फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने आपल्या अहवालात रुग्णालयाच्या गंभीर दुर्लक्षाचे संकेत दिले आहेत. त्यानंतर भंडारा पोलिसांनी आणखी काही डीव्हीआर पाठवून काही प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत. या घटनेनंतर भंडारा पोलिसांनी रुग्णालयाचे तीन डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजेच डीव्हीआर कलिना एफएसएल पाठवले होते. एसएनसीयूच्या आत आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पोलिसांना हवे होते जेथे 10 नवजात मुलांचा मृत्यू झाला होता.

भंडारा रुग्णालय आग : अनेक माता-पित्यांनी पोटच्या बाळांना मनभरून पाहिलंही नव्हतं

फॉरेन्सिक विभाग सीसीटीव्ही फुटेजचा डेटा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. हा व्हिडिओ एसएनसीयूच्या आतील आहे, ज्यामधून स्पष्ट होते की खोलीत आग होती तेव्हा 21 मिनिटांपर्यंत कोणीही खोलीत आत दिसत नाही.

भंडारा रुग्णालय आग : दिवस उजडताच दुःखद बातमी मिळाली अन् आईच्या पायाखालची जमीन सरकली!

एफएसएलला प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही अहवालानुसार महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागण्याच्या वेळी नर्स तिच्या नर्सिंग स्टेशनमधून गायब असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रुग्णालयाच्या इतर कर्मचार्‍यांनाही आगीची माहिती जवळपास 21 मिनिटांनंतर समजली. कामाच्या ठिकाणी नर्सची अनुपस्थिती रुग्णालयाचा बेजबाबदारपणा सिद्ध करतो. या प्रकरणात एफएसएल आपला दुसरा अहवाल या आठवड्याच्या अखेरीस सादर करण्याची शक्यता आहे.

बातम्या व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 July 2026: जुलैचा दुसरा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! गुरूवारचा शुभ संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य...
जुलैचा दुसरा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! गुरूवारचा शुभ संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य...
Ind vs Eng 1st T20 Live Score : 6 धावांवर 2 विकेट्स... मग अभिषेक-श्रेयसचा राडा; दुबने इंग्लंडला धुतलं, थेट 189 धावांचा डोंगर
6 धावांवर 2 विकेट्स... मग अभिषेक-श्रेयसचा राडा; दुबने इंग्लंडला धुतलं, थेट 189 धावांचा डोंगर
धक्कादायक! पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहण, तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू 
धक्कादायक! पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहण, तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू 
चेंबूर झाड दुर्घटना : निष्काळजीपणाचा ठपका, मुंबई महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
चेंबूर झाड दुर्घटना : निष्काळजीपणाचा ठपका, मुंबई महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget