एक्स्प्लोर
Bhandara Rain : गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले, धरणातून 94 हजार 495 क्युसेस वेगानं विसर्ग
मागील दोन दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावलीय.. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरनं उघडलेत. या 23 दरवाजांमधून 94 हजार 495 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला असल्यानं प्रशासनानं नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
आणखी पाहा


















