Bhandara Dhan Kharedi : भंडाऱ्यात धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना मनस्ताप
Bhandara Dhan Kharedi : भंडाऱ्यात धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना मनस्ताप भंडारा जिल्ह्यात सध्या धान खरेदी हाच बहुचर्चित विषय ठरला आहे. यावर्षी 256 धान खरेदी केंद्र सुरू करण्याचं उद्दिष्ट पणन कार्यालयानं ठेवलं मात्र, त्यातील जेमतेम केवळ 60 केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे. केंद्र सुरू नं झाल्यानं धान खरेदीसाठी होत असलेला पणन विभागाचा वेळकाढूपणामुळे धान उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. 20 नोव्हेंबरला भंडाऱ्यात पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. त्यात जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र तातडीनं सुरु करुन धान खरेदी करण्याचे निर्देश दिले होते.


















