Ajit Pawar Beed : 27 ऑगस्टला अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा
अजित पवारांनी पुन्हा एकदा, शरद पवारांच्याच पावलावर पाऊल टाकल्याची... पण वेगळ्या अर्थाने... १७ ऑगस्टला शरद पवार यांनी धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये जाऊन सभा घेतली. त्यात त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भाजप या सगळ्यांवर सडकून टीका केली होती. त्याच टीकेला उत्तर देण्यासाठी अजित पवार आता पुढे सरसावले आहेत. येत्या २७ ऑगस्टला अजित पवार यांची जाहीर सभा होणारेय. आणि त्यासाठी त्यांनी ठिकाण निवडलंय, शरद पवारांनी जिथं सभा घेतली, त्या बीडचंच... खरंतर, अजित पवार हे शरद पवारांचं बोट धरूनच राजकारण शिकले... त्यांच्या पावलावर पाऊल टाकतच अजितदादांची वाटचाल झाली... आताही अजित पवार हे शरद पवारांच्याच पावलावर पाऊल टाकतायत, मात्र त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी..























