Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?
Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?
मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी (Materi Village) या मूळगावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. डीजे वाजवण्याच्या वादातून गावातील दोन गट आमनेसामने आल्याने ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मातेरी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता.
मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी शहरांमध्ये पोलीस दाखल झाले. मात्र, मातेरी शहराच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्तारोको रात्रभर सुरू