एक्स्प्लोर
CM-PM Meet : आम्हाला आरक्षण हवं, कोण कोणाला भेटतं हा आमचा मुद्दाच नाही : विनोद पाटील
मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आम्हाला आरक्षण हवं, कोण कोणाला भेटतं हा आमचा मुद्दाच नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.
आणखी पाहा























