Raj Thackeray यांचं काल Aurangabad मध्ये जंगी स्वागत, आज औरंगाबादेत होणार 'राज'गर्जना
Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : आज महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. काल राज ठाकरेंच्या प्रवासादरम्यान मनसैनिकांनी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं. काल पुण्याहून निघण्याआधी राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते.. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास 100 ते 150 पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. वाटेत राज ठाकरे यांनी वढू गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर राज यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला.























