Maharashtra Collage Reopen : उद्यापासून कॉलेज सुरु; औरंगाबादमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी तयारी सूरु
उद्यापासून कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे... ठरलेल्या मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी प्राचार्य आणि प्राध्यापकांवर असेल..
औरंगाबादमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी कशी तयारी सूरु आहे पाहुया
महत्त्वाच्या बातम्या























