एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar G20 : जी-२० परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज
आज आणि उद्या होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज झालंय. कालपासूनच परिषदेसाठी परदेशी पाहुणे शहरात दाखल होण्यास सुरुवात झालेय.. वेगवेगळ्या देशातील 150 महिला सदस्यांची ही दोन दिवस परिषद असणार आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भागवत कराड, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. जी20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर स्वच्छ करण्यात आले होते. मात्र काही उपद्रवी नागरिकांनी त्यातही शहराचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला... अशा 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी आणि भितींवर थुंकल्याप्रकरणी ही गुन्ह्याची नोंद झालेय.
आणखी पाहा























