Aurangabad : कोरोनानंतर विद्यार्थी मदरशात? शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात धक्कादायक प्रकार उघड
कोरोना संकटानंतर जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करताना शिक्षण विभागासमोर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शालाबाह्य मुलांनी शाळेत न येण्यामागची कारणं काय आहेत, हे शिक्षण विभागानं जाणून घेतलं. यावेळी काही गावांतील मुले शाळेच्या वेळात मदरशांमध्ये जात असल्याचं आढळलं. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांतील उपस्थिती कमी होत आहे. परिणामी आता औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एक आदेशच काढलाय. जिल्हा परिषद शाळांत केवळ नावालाच हजर आणि प्रत्यक्षात मदरशांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी करा आणि माझ्याकडे पाठवा, असे आदेश चव्हाण यांनी दिलेत. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र गेलंय.























