एक्स्प्लोर
CoronaVirus | औरंगाबाद जिल्ह्यातील यात्रांवर कोरोना विषाणूचं सावट
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं संकट लक्षात घेता, नाथषष्ठी, मांगीरबाबासह इतर यात्रांबाबत निर्णय घेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता, औरंगाबादेतील यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे. पैठणमधील नाथषष्टी उत्सवाला राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात. तरी गर्दी टाळण्यासाठी १५ दिवस चालणारा हा उत्सव साजरा करायचा की नाही, याबाबत प्रशासन काय निर्णय घेतं, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
आणखी पाहा























