Devendra Fadnavis Amit Shah | साखरेच्या प्रश्नावर गृहमंत्री अमित शाहांची भेट - देवेंद्र फडणवीस
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. फडणवीस यांनी शहा यांच्यासोबत दीड तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही.
'यावर्षी महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढल असून शेतकऱ्यांना एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. याबाबत अमित शहांबरोबर सकारात्मक चर्चा झाली.सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न नसून आम्हाला त्यात रस नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं, असे देखील फडणवीस म्हणाले.






















