Rain Damage | वारा आणि पावसाचा कोंडेश्वरला मोठा फटका, घरांची पडझड, अन्नधान्यही भिजलं, विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित
अंबरनाथ तालुक्यात बदलापूरजवळच्या कोंडेश्वर परिसरात बुधवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे या भागातील बेंडशीळ, चाफ्याची वाडी यासह अनेक गावं आणि आदिवासी पाड्यांना मोठा फटका बसला. यात अनेक घरांची पडझड झाली असून काही कच्ची कुडाची घरं तर पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना खायला अन्नधान्यही राहिलेलं नाही. अनेक घरांचे पत्रेही उडाले, शिवाय झाडं आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत व्हायला किमान 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे आणि अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी आज या नुकसानाची पाहणी केली.






















