एक्स्प्लोर
Amol Mitkari Akola : अभंगांचे गायन, फुगड्या, विठुनामाचा गजर; मिटकरी झाले वारीत दंग
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ओळखले जातात ते म्हणजे त्यांच्या सभा गाजवणाऱ्या भाषणांसाठी... काल आमदार अमोल मिटकरींचं एक वेगळंच रूप पहायला मिळालंय. हे रूप होतं भक्तीत तल्लीन झालेल्या एका वारकऱ्याचं. निमित्त होतं संत श्री वासुदेव महाराज पालखीच्या झालेल्या आगमन सोहळ्याचं.यावेळी त्यांनी भाजपा नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्यासोबत फेर धरत फुगडी घातलीय. यासोबतच त्यांनी 'धन्य आज दिन संत दर्शनाचा' हा अभंग गात पालखीमध्ये वारकऱ्यांसमवेत सहभाग घेतलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























