एक्स्प्लोर
Shirdi : शिर्डीच्या मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला 70 वर्ष पूर्ण, मूर्तीची झीज टाळण्याची गरज
शिर्डीतल्या साईबाबा मंदिरातील मूर्तीला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. मूर्तीची झीज टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत असं मत तज्ज्ञांनी मांडलंय. साईबाबांची मूर्ती 1954 साली भाऊसाहेब तालीम यांनी इटालियन मार्बलपासून बनवली होती. मंगलस्नान आणि पूजाअर्चा यामुळे सुरवातीला असणारी साईमूर्ती आता बदलत असल्याचं समोर आलंय. ((भविष्यात मुर्ती बदलण्याची वेळ आली तर या मुर्तीसारखीच हुबेहुब मुर्ती व्हावी यासाठी थ्रीडी स्कॅनिंग द्वारे डाटा संकलीत करून ठेवण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलय.)) याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल असं साई संस्थानने म्हटलंय.
आणखी पाहा























