(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Zaware : निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे मारहाणप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा
खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल झावरे यांना काल पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाली होती...याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात 12 आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय...काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत ज्यांना जबर मारहाण करण्यात आली...राहुल झावरे यांच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे...निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल झावरे यांना सुजय विखे यांचे कट्टर समर्थक असलेले विजय औटी आणि इतर 8 ते 10 जणांनी मारहाण केली होती...दरम्यान यानंतर पारनेरमध्ये तणाव वाढला होता...खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते...दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पारनेमध्ये पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आलाय...आढावा घेतला आहे आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.