एक्स्प्लोर
Ahmednagar Kopargaon : कोपरगावमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी चासनळी प्रातमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच, रुग्णवाहिकेचा कंत्राटी चालक आणि कंत्राटी डॉक्टर साक्षी सेठी यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ३ ऑगस्टची ही घटना बरीच उशिरा समोर आली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यामुळे चौकशी सुरू झाली, आणि त्याच्या अंती कारवाई करण्यात आली आहे.
आणखी पाहा






















