एक्स्प्लोर
Ahmednagar HSC Paper Leak : बारावी गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी नगरमधून मुख्याध्यापकासह 5 जणांना अटक
बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी नगरमधून एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केलीये. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्याला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचे समोर आले.
आणखी पाहा























