एक्स्प्लोर
Ahmednagar Flood : सावेडी परिसरातील रस्ते जलमय, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी
Ahmednagar Flood : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली...सायंकाळी सहा वाजल्यापासून शहरात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अक्षरशः घरात शिरले...सावेडी भागातील गुलमोहोर रोडवरील नरहरी नगर येथे अनेक घरात गुडघाभर पाणी शिरले...त्यामुळे घरातील पाणी काढताना नागरिकांची मोठी तारांबळ उडाली... पाण्यामुळे घरातील वस्तूंचे मोठे नुकसान, तर नालीचे पाणी घरात शिरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती... सावेडी भागातील अनेक ओढे- नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने तसेच महापालिकेने सदोष रस्ते बांधल्यानेच घरात पाणी शिरत असल्याचा आरोप नगरकरांनी केलाय.
आणखी पाहा























