म्यानमारच्या मांगडाओमधून सर्वच रोहिंग्या मुस्लिम हद्दपार
रोहिंग्या मुस्लिमांवरुन म्यानमारमध्ये उभा राहिलेला संघर्ष थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही त्याला यश आलं नाही, असं म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग स्यान स्यू की यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे म्यानमार देशाच्या मांगडाओ शहरातून जवळपास सर्वच रोहिंग्या मुस्लिमांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती एका एजन्सीनं दिली आहे. म्यानमारबरोबरच संपूर्ण जगात सध्या रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. म्यानमारमधून पलायन करुन अनेक रोहिंग्या मुस्लिम बांगलादेश, भारतासह इतर अनेक देशात शरणार्थी म्हणून राहात आहेत, मात्र काही रोहिंग्या मुस्लिमांचे याआधी आढळलेलं दहशतवाद्यांशी कनेक्शन यामुळे भारतानंही देशाच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं आहे.






















