एक्स्प्लोर
मुंबई : जे. जे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
मुंबई : डॉक्टरांवरील हल्ल्याची प्रकरणं सुरुच आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतर मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना नातेवाईकांकड़ून मारहाण करण्यात आली आहे. तसंच रुग्णालयाची तोडफोडही केली.
जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडीओ ही समोर आला आहे.
या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना म्हणजेच मार्डकडून दुपारी निषेध करण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या एका डॉक्टरवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement