एक्स्प्लोर
मुंबई | अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन, शिवसेना नेते शिशीर शिंदे यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.
आणखी पाहा






















