'ट्राय'च्या आक्षेपांसदर्भात आमदार अनिल परब यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ट्रायनं जाहीर केल्यानंतर आता केबल व्यावसायिकांची संघटना आक्रमक झालीय. आज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत म्हणजे प्राईम टाईमला राज्यातील केबल बंद ठेवण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिल परब यांनी ही माहिती दिलीय. महत्वाच्या वेळेमध्येच केबल बंद राहणार असल्याने राज्यभरातील दर्शकांना त्रास सहन करावा लागणार आहे. ट्रायच्या नव्या धोरणानुसार सर्व चॅनल पाहणं ग्राहकांना महागात पडू शकतं. विदर्भातल्या केबल व्यावसायिकांनी आज संध्याकाळचं शटडाऊन मागे घेतलंय. तरी, राज्यात इतर ठिकाणी मात्र केबल बंद राहणार असल्याचं केबल व्यावसायित संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार अनिल परब यांनी सांगितलं आहे





















