Raj Thackeray यांच्या आवाजात अभिजित देशपांडेंच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा Teaser ABP Majha
मनसे नेते अभिजित देशपांडे यांच्या बहुप्रतिक्षित हर हर महादेव चित्रपटाचा टीझऱ नुकताच लाँच झालाय. टीझरची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाजानं करण्यात आलीय. अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे. यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सकारात्मकतेची, शौर्याची, देश प्रेमाची ज्योत पेटवणार का, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.






















