Natya Parishad Nivadnuk: मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुका, प्रसाद कांबळी वि. प्रशांत दामले अशी लढत
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशात आज याची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ९ः३० ते संध्याकाळी ५ः३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. यंदा प्रशांत दामले यांचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल तर प्रसाद कांबळी यांचं आपलं पॅनल यंदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभं ठाकलंय. यंदाच्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून राजकीय हस्तक्षेप होत असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रशांत दामले यांच्या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत तर दुसरीकडे प्रसाद कांबळींच्या पॅनलमध्ये रंगमंच कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे एकमेकांवर होत असलेल्या राजकीय आरोपात नाट्यकर्मी नेमकी कुणाची निवड करणार हे बघणं महत्त्वाचे असेल.























