Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढण्याची शक्यता ABP MAJHA
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २०० कोटींच्या अफरातफरीचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनवर जवळपास १० कोटींची उधळपट्टी केलीय. त्याने जॅकलिनला गिफ्टमध्ये ५२ लाखांचा घोडा, प्रत्येकी ९ लाखांच्या चार फारसी मांजरी भेट दिल्याचा खुलासा सुकेशने केलाय. याशिवाय जॅकलिनला दागिने, हिरेजडीत दागिन्यांचा सेट दिल्याचंही त्याने म्हटलंय. सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. सुकेश, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि अन्य सहा जणांविरोधात ईडीने सात हजार पानी आरोपपत्र दाखल केलंय. सुकेशच्या लाभार्थ्यांमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव आलंय. अभिनेत्री नोरा फतेहीला त्याने १ कोटींची BMW कार गिफ्ट दिलीय. ईडीनंही या दोन्ही अभिनेत्रींशी चौकशी केली आहे. नोराची चौकशी झाल्यानंतर तिनं आपली बाजू एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली होती.मनी लॉड्रींगशी संबंध नसल्याचं नोरानं म्हटलं होतं.
![Chhaava movie review: विकी कौशलचा 'छावा' सिनेमा कसा आहे? पहिला मराठी रिव्ह्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/6b3dbb0fe8762b8c04697922ddaf53191739618122473718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ranveer Allahbadia : रणवीर अलाहबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/76d1d8439c02866562bd89e2b4db70d817395470057101000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/4439326b2604823bd813512318a8d1e8173938465332390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan Case Update : सैफ अला खान प्रकरणात तपास अधिकारी बदलला, कारण अद्याप अस्पष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/469693f6eb96312fee5e235d8f12b1c217374720625471000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/ac5cd9ecffbd9e806f2fa683ba36aac417374616232571000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)