Hemant Birje injured in car accident : सिनेअभिनेते हेमंत बिर्जे अपघातातून थोडक्यात बचावले ABP Majha
सिने अभिनेते हेमंत बिर्जे अपघातातून थोडक्यात बचावले. धक्कादायक बाब म्हणजे सर्दीची औषधं घेऊन गाडी चालवणं त्यांना महागात पडलं. औषध घेऊन गाडी चालवताना झोप लागली आणि ही चूक अपघाताला कारणीभूत ठरली. मुंबईतून पुण्याकडे जात असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ त्यांना झोप येऊ लागली. काही वेळात त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी दुभाजकाला जाऊन धडकली. हेमंत बिर्जे यांच्यासह गाडीमध्ये असलेली त्यांची पत्नी आणि मुलगीही या अपघातात जखमी झाली. सुदैवानं तिघेही या अपघातातून बचावले. या गोळीनं हेमंत बिर्जे यांना इतकी गुंगी आली होती की त्यांच्याबरोबर मुलगी आणि पत्नी होत्या याचाही त्यांना काही काळ विसर पडला.





















