एक्स्प्लोर
Dilip Kumar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक






















