Arjun Rampal | बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची आज पुन्हा NCBकडून चौकशी
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर चव्हाट्यावर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचीही चौकशी करण्यात आली होती. पुन्हा एकदा अर्जुन रामपालला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आलं असून 16 डिसेंबर म्हणजेच, आज अर्जुन रामपालला चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये हजर राहावं लागणार आहे.
अर्जुन रामपालला पुन्हा एकदा एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी 13 नोव्हेंबर रोजी अर्जुनची एनसीबीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती. बॉलिवूड ड्रग्ज केस प्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीने अर्जुन रामपालच्या घराची झडती घेतली होती. अर्जुनच्या घरातून काही इलेक्ट्रिक उपकरण आणि औषधं ताब्यात घेतली होती.





















