UGC : विद्यापीठ अनुदान आयोगानं आता 3 ऐवजी 4 वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे
विद्यापीठ अनुदान आयोगानं आता 3 ऐवजी 4 वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. या अभ्यासक्रमाच्या पद्धतीत काही बदल सूचवले आहेत. त्यानुसार चार वर्षांच्या अभ्यासक्रमात दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदविका प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव आहे. तसंच पीएचडी नियमांमध्येही सुधारणा केल्या जाणार आहेत. 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यास 1 वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र. या अभ्यासक्रमात दोन वर्षे पूर्ण केल्यास विदयार्थ्याला पदविका प्रमाणपत्र मिळणार. तीन वर्षे पूर्ण केल्यास विद्यार्थ्याला पदवी मिळेल, दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही पात्र. पीएचडीसाठी कमाल कालावधी ६ वर्षे निर्धारित करणार.


















