Health Department Exam च्या हॉल तिकिटांचा घोळ कायम, 24 तास आधी परीक्षा केंद्रच बदलली!
राज्याच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना चक्क उत्तर प्रदेशातील परिक्षा केंद्रांचा पत्ता देण्यात आल्याने गोंधळ उडालाय. राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल सहा हजारांहून अधिक पदे भरण्यासाठी 25 आणि 26 सप्टेंबरला परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी एका खाजगी कंपनीला परिक्षा घेण्याचे काम देण्यात आलेय. मात्र या कंपनीकडून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशचे वेगवेगळे पत्ते देण्यात आलेत तर काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फक्त मोकळी जागा सोडण्यात आलीय तर काहींच्या हॉल तिकिटावर महाराष्ट्रातील परिक्षा केंद्रांचे पत्ते आहेत पण तेही अर्धवट . अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परिक्षेसाठी असा गोंधळ सुरु झाल्याने विद्यार्थि संभ्रमात सापडलेत.


















