SSC Result : यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के, मुलींचीच बाजी, 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
यंदाच्या निकालात दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.


















