Shraddha Walkar Father Phono Exclusive : श्रद्धा वालकरच्या वडिलांनी मुलीच्या भल्यासाठी काय - काय केलं?
वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावाला यानं केली आणि देश हादरला. हत्येनंतर या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येतेय. आज एबीपी माझानं श्रद्धा वालकरच्या वडिलांशी संवाद साधला, तेव्हा या सगळ्या प्रकरणावर प्रथमच त्यांचं मन मोकळं केलं. मुलीच्या भल्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि आफताबशी तिचं लग्न व्हावं म्हणून त्याच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्यांचा काय अनुभव होता हेदेखिल त्यांनी माझाशी बोलताना सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येत आफताब पूनावालाच्या कुटुंबीयांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर तिच्या वडिलांनी प्रथमच आपली सविस्तर भूमिका माझाकडे मांडली.






















