एक्स्प्लोर
Pune Crime : आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटूच्या हत्येनं पुणं हादरलं; कोयत्यानं वार करत निर्घुण हत्या
एका आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय कबड्डीपटूच्या हत्येनं पुणे हादरलंय. कबड्डीचा सराव करत असताना ओळखीतील मुलानंच कोयत्यानं वार करत या कबड्डीपटू मुलीची निर्घृण हत्या केलीए. बिबवेवाडी परिसरातल्या यश लॉन्सजवळ ही धक्कादायक घटना घडली. यावेळी त्या मुलीचं शीर धडापासून वेगळं करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेनं पुण्याचे पालकमंत्री आणि राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राक्षसी कृ़त्य करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तर प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. आरोपींचा शोध सुरु आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























