एक्स्प्लोर
पुण्यात भर रस्त्यात वाहतूक पोलिसांवर लोखंडी रॉडनं हल्ला, मारहाणीत वाहतूक पोलीस गंभीर जखमी
पुणे : पोलिसांवर हल्ला होण्याची गंभीर घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील चाकण परिसरात तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण करत केल्याच्या घटनेनं सध्या खळबळ माजवली आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं जखमी अवस्थेत पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध झाले. ज्यानंतर त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सदर प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
आणखी पाहा























