एक्स्प्लोर
#ArnabGoswami अर्णब यांची आजची रात्रही तुरुंगातच, हायकोर्टाकडून दिलासा नाही, उद्या पुन्हा सुनावणी
अर्णब गोस्वामींना तातडीचा कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य सरकारनं यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे युक्तिवाद ऐकण्यास असमर्थ असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम सलग दुस-या रात्री अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डात असणार आहे. अलिबाग सत्र न्यायालयात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर 7 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान अर्णब गोस्वामीनं अलिबाग दंडाधिकारी कोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















