एक्स्प्लोर
Brother-Sister Murder औरंगाबादेत बहीणभावाची निर्घृण हत्या,दीड किलो सोन्यासह साडेसहा हजार लंपास
सख्ख्या बहीण भावाची हत्या करुन दीड किलो सोनं लंपास केल्याची घटना औरंगाबादच्या सातारा परिसरात घडली आहे. मारेकऱ्यांनी हत्येनंतर घरातली साडेसहा हजाराची रोकडही लंपास केली. किरण खंदाडे आणि सौरभ खंदाडे अशी मृत बहीण भावाची नावे आहेत. आईवडील गावी गेल्यानं बहीणभाऊ रात्री घरात दोघेच होते. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
आणखी पाहा























