Palghar : 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, विकृती थांबवण्यासाठी करायचं काय?
पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका परिसरात या पाच वर्षीय मुलीबरोबर सोमवारी रात्रीच्या सुमारास 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. अतिप्रसंग करणारा आरोपी 12 वर्षीय आहे. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर (जुविलीयन कोर्ट) हजर केले जाणार असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिली आहे.























