BMW कंपनीची ई-स्कूटर आहे खूप खास, एका चार्जमध्ये देते 130 किमीची रेंज
BMW Electric Scooter: लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी BMW च्या वाहनांची क्रेझ अनेक लोकांना आहे. कारसोबत बीएमडब्ल्यू कंपनी मोटरसायकललसुद्धा बनवते आणि कदाचित तुम्हाला माहिती नसावं पण बीएमडब्ल्यू कंपनीने पहिल्यांदा 2017 मध्ये BMW CE 04 स्कूटर सादर केली होती.
BMW Electric Scooter: लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी BMW च्या वाहनांची क्रेझ अनेक लोकांना आहे. कारसोबत बीएमडब्ल्यू कंपनी मोटरसायकललसुद्धा बनवते आणि कदाचित तुम्हाला माहिती नसावं पण बीएमडब्ल्यू कंपनीने पहिल्यांदा 2017 मध्ये BMW CE 04 स्कूटर सादर केली होती. आता ही स्कूटर लॉन्च होण्यासाठी सज्ज झाली आहे. ही कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे, पण त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नाही.
यापूर्वी लोकांना BMW Motorrad ही दुचाकी खूप आवडायची. या कंपनीची स्कूटर अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. शहरी भाग लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. पण अवघ्या फक्त 1 तास 40 मिनिटामध्ये ही गाडी पूर्णपणे चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.
लुक आणि डिझाइन
कंपनीने या स्कूटरला दोन व्हेरियंटसह लॉन्च केले आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड आणि Avantgarde प्रकारांचा समावेश आहे. लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ही गाडी खूपच स्पोर्टी दिसते. कंपनीने ही स्कूटर केवळ एक संकल्पना म्हणून सुरू केली. ही गाडी फक्त एकाच रंगात उपलब्ध आहे. ज्यामध्ये समोरील बाजूस पांढऱ्या रंगासह ब्लॅक सरफेस फिनिश देण्यात आले आहे. BMW CE 04 ला फ्लोटिंग सीट मिळते. Avantgarde प्रकाराची किंमत थोडी जास्त आहे आणि ही गाडी दिसण्यातही खूप वेगळी आहे. यामध्ये ब्लॅक ऑरेंज सीट आणि अनेक प्रकारचे ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
किंमत आणि मोटरची पॉवर
BMW CE 04 ची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे 9.36 लाखांपासून सुरू होते. ही सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. पण याबाबत एका अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यानुसार, जर ही गाडी आपल्या देशात आयात केली गेली तर त्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये असू शकते.
यात 31 किलोवॅटची मोटर आहे. ही जास्तीत जास्त 42 एचपी पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचप्रमाणे फक्त 2.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग 120 किमी प्रतितास आहे.
फक्त 1.40 तासात पूर्ण चार्ज
BMW CE 04 मध्ये 8.9 kWh ची बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 130 किमी पर्यंत धावू शकते. त्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ती बॅटरी फ्लोअर बोर्डच्या आत देण्यात आली होती. याशिवाय बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 1 तास 40 मिनिटे लागतात. यासाठी 6.9 kW चा चार्जर वापरता येईल. याशिवाय, सामान्य म्हणजे 2.3 kW चार्जरने चार्ज करण्यासाठी सुमारे 4 तास 20 मिनिटे लागतात.