Zero Hour With Sarita Kaushik : 'त्या' निधीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार? ABP Majha
महाविकास आघाडीचं सरकार ते शिंदे सरकार... गेल्या चार वर्षांमध्ये अनेक सभांमधून... अनेक मंचावरुन... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत.. की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... दोन्ही नेत्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये हिंदुत्वाचा पुरस्कार केला.. मात्र, आज त्यांच्या याच भूमिकेवर थेट विश्व हिंदू परिषदेनंच प्रश्न चिन्ह उपस्थित केलेत..
नमस्कार... मी सरिता कौशिक.. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत.. महायुतीसमोरच्या महाआव्हानांची... आणि महाविकास आघाडीसमोरच्या नव्या आव्हानांची...
सुरुवातीला महायुतीसमोरची आव्हान...
लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा जनतेसमोर जात असताना.... एनडीएला आधी सरसंघचालक मोहन भागवतांनी खडे बोल सुनावले.. त्यानंतर संघाच्या विचाराच्या ऑर्गनाझर साप्ताहिकातून भाजपच्या चुकांचा पाढा वाचला गेला..
आणि आता थेट विश्व हिंदू परिषदेनंच भाष्य केलंय.. त्याला कारण ठरलाय.. राज्यातील महायुती सरकारचा एक निर्णय..
त्याचं झालं असं की राज्याच्या अल्पसंख्यांक विभागानं वक्फ बोर्डासाठी कोटींचा निधी दिला.. आणि त्यावर विश्व हिंदू परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केलीय.. ती पाहुयात..